Sharing the Paper - Game


कागदाचा सह्भागिता खेळ
         हा खेळ माझ्या शाळेतील ९ वी च्या विद्यार्थ्यान समवेत घेतला.
  मुला मुलींचे वेगवेगळे चार जणांचे गट तयार केले.
        प्रत्येक गटास वर्तमान पत्राचे पान  देण्यात  आले. प्रत्येक गटाने आपापल्या गटास देण्यात आलेल्या कागदावर प्रथम उभे राहून नंतर सांगितल्याप्रमाणे १ ते ५ अंक मोजून त्यानंतर कागदाची घडी घालून कमी आकारमान असलेल्या जागेत सर्व जणांनी उभे राहण्याचा प्रयत्न केला. सर्वजण जोपर्यंत एकत्र  उभे राहू शकत होते. तोपर्यंत घडी  घालण्याची कृति करत होते. सरते शेवटी सर्व गटांनी आपापले कागद एकमेकांना दाखवले.

अनुभव –
     
                संसाधनांचा कसा कल्पकतेने वापर करावा, कमी संसाधने सुद्धा कसे नियोजन करावे याचा त्यांना बोध झाला,सहकार्याचे महत्व जाणवले.काही गटांच्या घडीच्या पद्धतीवरून त्यांच्या नियोजनाची,कल्पकतेची जाणीव झाली.सहकार्यामुळे कोणतेही आव्हान पेलणे सहज शक्य  होते. याची जाणीव झाली.


Comments

Popular posts from this blog

Adjective Game