संपत्तीचे रक्षणाचा खेळ संपत्तीचे रक्षणाचा खेळ – वर्गातील मुलांचा पाच जणांचा गट तयार केला.त्यानंतर शा फुट व्यासाचा वर्तुळ तयार केला.प्रत्येक गटातील एकास रुमाल देऊन तो रक्षण करण्याचा प्रयत्न केला तर इतरांनी हिसकवण्याचा,हिसकवल्यावर तो त्या संपत्तीचा मालक होऊन रक्षण करण्याचे कां केले तर आधीचा मालक गटामध्ये सामील होऊन संपत्ती हिसकवण्याचा प्रयत्न करू लागला.काही गटात एखादा मुलगा सोता सर्वांना संपत्ती हिसकावता आली.बाकी सर्व गटातील प्रत्तेकाने रुमाल हिसकावला. अनुभव – जवळपास एखादा मुलगा सोडता सर्वांना दोन ते तीन वेळा रुमाल घेता आला,रक्षण करताना सदैव जागरूक राहावे लागणार,नाहीतर संपत्ती गमवावी लागणार ही भावना मनात आली संपत्ती गमवल्यावर गाफील राहिल्याची व वाईट वाटल्याची भावना जागवली.व परत असे होऊ द्यायचे नाही,असे वाटले.संपत्ती हिसकावताना ती कशा प्रकारे घेता येईल त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला हिसकावल्यावर कशा कुशलतेने घेता आली त्याचा अनंद झाल...